
सामना ऑनलाईन । हैदराबाद
तेलंगणातील आमदार धनासारी अनासुया उर्फ सीथाक्का यांच्या गाडीने एका बाईकला धडक दिली असून या अपघातात तीन वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मुलीचे आईवडिल गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुलुगू जिल्ह्यातील जीदीवागू या गावाजवळ हा अपघात झाला. के. अरूण हे त्यांची पत्नी विजया व तीन वर्षाची मुलगी श्रवंती हिला घेऊन श्रवंतीच्या शाळेत चालले होते. त्यावेळी मागून येणाऱ्या एका गाडीने त्यांच्या बाईकला ठोकले. या अपघातानंतर तिघेही बाईकवरून खाली पडले. यात श्रवंतीच्या डोक्याला जबर मार बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर तिचे आई वडिल गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात इपचार सुरू आहेत.
या अपघाताच्या वेळी आमदार धनासारी अनासुया या गाडीतच होत्या. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या तपासकरत आहे.



























































