
शेततळ्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. शेततळ्यापासून दिडशे मिटर अंतरावर दोन सायकली आढळून आल्या आहेत. हे तिन्हीही तरुण बजाजनगर येथील रहिवासी आहेत.
संभाजीगरच्या वाळूज एमआयडीसीमधील बजाजनगर येथील सारा संगम मधील रहिवासी तिरुपती मारोती इंदलकर (15), शिवराज संजय पवार (17) आणि प्रतिक आनंद भिसे (15) हे तिन तरुण दोन सायकलवरुन पोहण्यासाठी भांगसीगड माता परिसरात असलेल्या शेकापूर शिवारातील गटनंबर 8 मधील नारायण हरिश्चंद्र वाघमारे यांच्या शेतातील शेत तळ्यात पोहण्यासाठी गेले होते. याच शेततळ्यात या तरुणांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या पथकाने त्यांचे मृतदेह शेततळ्यात बाहेर काढले. घटनास्थळी पोलीसही दाखल झाले आहेत.
























































