विनातिकीट प्रवाशांची टीसींना बेदम मारहाण

539
fight
file photo

पश्चिम रेल्वेमार्गावरील वांद्रे स्थानक आणि हार्बरच्या किंग्ज सर्कल या स्थानकांवर विनातिकीट प्रवाशांकडून टीसींना बेदम मारहाण करण्याच्या दोन विविध घटना उघडकीस आल्या आहेत. वांद्रे येथील घटनेतील आरोपी पळून गेला असला तरी किंग्ज सर्कल घटनेतील दोघा आरोपींना अटक करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. सकाळी 10.30च्या सुमारास एक प्रवासी विनातिकिट प्रवास करून वांद्रे स्थानकात फलाट क्रमांक चार वर उतरला. त्यावेळी त्याच्याकडे तिकिट तपासनीस विवेक रॉय यांनी तिकिटांची मागणी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. या अज्ञात प्रवाशाने रॉय यांना रेल्वेरूळावर ढकलून दिले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर दुसऱ्या एका घटनेत हार्बरच्या किंग्ज सर्कल स्थानकात दुपारी साडेचारच्या सुमारास टीसी हरेराम शर्मा यांना विनातिकीट प्रवासी तौफीक कुरेशी आणि अन्सारी यांनी बेदम मारहाण केली. शर्मा यांच्या भायखळा येथील रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही आरोपींना पोलिसांनी पकडले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या