आता विम्बल्डनमध्ये टायब्रेकचा अवलंब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लंडन

अंतिम सामना जादा वेळेत गेल्यास त्यामुळे खेळाडूंना उद्भवणार्‍या दुखापतींकडे विम्बल्डन आयोजकांनी गांभीर्याने लक्ष दिले असून याच पार्श्वभूमीवर आता पुढल्या वर्षापासून अंतिम सेटमध्ये टायब्रेकचा अवलंब करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक गटामध्ये टायब्रेक अनिवार्य करण्यात येणार आहे, पण उभय खेळाडूंमध्ये 12-12 असा गुणफलक झाल्यानंतर टायब्रेकचा अवलंब करण्यात येणार आहे.