Tiger 3 Collection: बहुप्रतिक्षित चित्रपट टायगर 3 ची डरकाळी; पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर इतकी दणदणीत कमाई

दिवाळीच्या खास मुहूर्तावर सलमान खानने मोठा धमाका केला आहे. यावर्षीचा बहुप्रतिक्षित चित्रपट टायगर 3 हा सणासुदीच्या दिवशी म्हणजे 12 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सलमान खान आणि कतरिना कैफच्या टायगर 3 ने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. चित्रपटाने हिंदुस्थानात पहिल्या दिवशी 44.5 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. टायगर 3 हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलुगूमध्येही रिलीज झाला आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित टायगर 3 मध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ यांनी RAW चे अंडरकव्हर एजंट अविनाश टायगर सिंग राठोर आणि झोया हुमैमी यांच्या भूमिका साकारल्या आहेत.

सलमान खानच्या टायगर 3 ने पहिल्या दिवसाची कमाई 40 कोटींच्या पुढे नेत विक्रम केला आहे. तसेच टायगर हा चित्रपट 3 वर्षातील चौथा मोठा चित्रपट ठरला आहे. ज्याने पहिल्याच दिवशी 40 कोटींहून अधिक कमाई केली आहे. टायगर 3 ने सनी देओलच्या गदर 2 चा देखील पराभव केला आहे. रिपोर्ट्सनुसार, गदर 2 ने पहिल्या दिवशी 40.10 कोटींची कमाई केली होती. तर सलमानच्या टायगर 3 ने पहिल्या दिवशी 44.50 कोटींची कमाई केली आहे.

एक मनोरंजक गोष्ट म्हणजे ‘टायगर 3’ ने अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशी 22.97 कोटी रुपयांची कमाई केली. तर रिलीजच्या तारखेच्या दिवशी 21.53 कोटी रुपयांची स्पॉट बुकिंगही झाली. मात्र, दिवाळीला रिलीज झाल्याने चित्रपटाचेही नुकसान झाले. खरंतर पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत ‘टायगर 3’ शाहरुखच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ला मागे टाकू शकला नाही.

टायगर 3 चे ओपनिंग डे कलेक्शन बरोबर मानले तर दबंग खानने या बाबतीत सुलतान (36.54 लाख), टायगर जिंदा है (43.10 लाख) आणि एक था टायगर (32.92 लाख) या चित्रपटांना मागे टाकले आहे. याशिवाय सलमान खानचा बजरंगी भाईजान (27.25 लाख) आणि किक (26.40 लाख) देखील या बाबतीत मागे आहेत.