वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू, महिनाभरात पाच जणांनी जीव गमावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजुरा तालुक्यातील धानोरा गावाजवळील जंगलात एका गुराख्यावर वाघाने हल्ला केला असून या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या तालुक्यातील एका महिन्यातील ही पाचवी घटना आहे.

मृतकाचे नाव संतोष खानोरकर (42) आहे. मृतक हा रोज गुरे घेऊन जंगलात चरायला जायचा. शनिवारी दुपारी अचानक संतोषवर वाघाने हल्ला केला व तो जागीच ठार झाला. परिसरात दहशतीचे वातावरण असून वाघाचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी संतप्त गावकऱ्यांनी वन विभागाला केली आहे.