उमरेड अभयारण्यात वाघाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उमरेड-तवनी-कऱहांडला अभयारण्यातील उमरेड (वन्यजीव) वनपरिक्षेत्रात वनरक्षक जफरअली सय्यद यांना नाल्याजवळ ‘सावकार’ नावाने ओळखल्या जाणाऱया वाघाचे शव कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. शवविच्छेदन केले असता वाघाचे सर्व अवयव शाबूत होते. वाघाच्या अंगावर सुळे घुसलेल्या खुणा आणि तुटलेल्या अवस्थेत खुब्याचे हाड दिसून आले. यावरून दोन वाघांच्या झुंजीत मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला.