टायगर श्रॉफ टाटा मुंबई मॅरेथॉनचा ’फेस ऑफ इव्हेंट’

लांब पल्ल्याच्या स्पर्धांचे प्रणेते म्हणून ओळख असणाऱ्या प्रोकॅम इंटरनॅशनलने टाटा मुंबई मॅरेथॉन 2020 टायगर श्रॉफची फेस ऑफ द इव्हेंट म्हणून घोषणा केली आहे. आशियातील प्रतिष्ठsची मॅरेथॉन म्हणून ओळख असलेल्या मॅरेथॉनमध्ये 50 हजारांहून अधिक लोक सहभाग नोंदवतात.

 17व्या टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजन रविवारी 19 जानेवारी 2020 ला करण्यात येणार आहे. खुल्या 10 के चॅरिटी रनिंगसाठी ऑनलाइन नोंदणी 10 डिसेंबर 2019 पर्यंत किंवा संपूर्ण जागा भरेपर्यंत सुरू राहील. महिलांसाठी देखील ऑनलाइन नोंदणी 29 नोव्हेंबर 2019 पर्यंत किंवा संपूर्ण जागा भरेपर्यंत सुरू राहील.

सीनियर सिटीझन रन आणि चॅम्पियन्स विथ डीसॅबिलीटी गटासाठी ऑनलाइन नोंदणी 29 नोव्हेंबर 2019 पर्यंत किंवा संपूर्ण जागा भरेपर्यंत सुरू राहील. ड्रीम रनसाठी नोंदणी 22 नोव्हेंबर 2019 पर्यंत किंवा संपूर्ण जागा भरेपर्यंत सुरू राहील. नोंदणी व स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी tatamumbaimarathon.procam.in या संकेतस्थळाला भेट द्या असे आवाहन प्रोकॅम इंटरनॅशनलचे सहव्यवस्थापकीय संचालक विवेक सिंग यांनी केले आहे.

 

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या