
स्मार्टफोन चांगला दिसावा यासाठी अनेक जण फोनला रंगीबेरंगी वेगवेगळे कव्हर लावतात, परंतु फोन हाताळताना कधी कधी फोन मळकट आणि खराब होतो. त्यामुळे फोनची जशी काळजी घेतली जाते, तशीच फोनच्या कव्हरचीही काळजी घ्यायला हवी तरच फोन चांगला दिसतो, तसेच कव्हर अस्वच्छ होत नाही.
जुने कव्हर खराब दिसणारे असले तरी ते स्वच्छ करून तुम्ही त्याला पुन्हा वापरू शकता. कव्हरला गरम पाणी व डिश साबणात काही मिनिटे भिजवा आणि नंतर टूथब्रशने स्वच्छ करा. कव्हर स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडय़ाचा वापर करा. कारण तो घाण काढण्यास मदत करतो.