मधुमेहासाठी टीप्स

  • फणसाच्या पानांचा रस मधुमेहींसाठी गुणकारी मानला जातो. तो नियमित प्यायल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो.
  • पानकोबी आणि फरसबी याचा रस एकत्र करून तो नियमित प्यावा. या रसाने मधुमेह नियंत्रणात राहतो.
  • मधुमेह नियंत्रणात ठेवायचा असेल तर लिंबाच्या कोकळ्य़ा पानांचा रस प्यायल्यानेही त्याचा फायदा होतो.
  • मधमेहींसाठी चूर्णही फार प्रभावी मानली जातात. त्यासाठी बेलाच्या आणि सीताफळाच्या पानांचे चूर्ण तयार करून ते नियमित घ्यावे. त्याने
  • मधुमेह नियंत्रणात राहतो.
  • मधुमेही रुग्णांसाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खाण्यापिण्याचे पथ्य सांभाळणे. त्याच्या जोडीला योगासने करणे. याचबरोबर दररोज चालायला जाणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गकताकर उघडय़ा पायांनी चालणे. या गोष्टी नियमित केल्यास मधुमेह नियंत्रणात राहतो.
  • रात्री काबुली चणे भिजत घालावेत आणि सकाळी ते पाणी प्यायल्याने रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते.
  • भेंडीची भाजी मधुमेहींसाठी गुणकारी मानली जाते. त्या भाजीचा जास्तीत जास्त जेवणात समावेश करावा किंवा दोन-तीन भेंडी उभी मध्ये कापून रात्री पाण्यात भिजत ठेकावी आणि सकाळी उठल्याकर ते पाणी प्यावे.
  • त्याने मधुमेहींना फायदा होतो.
  • मधुमेहींसाठी दालचिनी आणि लवंग खूप गुणकारी आहे. त्यासाठी दोन ग्रॅम दालचिनी चूर्ण आणि एक लकंग पाण्यात उकळून ते पाणी काही वेळाने प्या. नियमित सकाळ-संध्याकाळ हे पाणी प्यायल्यास मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.