माठातील पाणी बाराही महिने

थंड पाणी मिळावं म्हणून माठात पाणी ठेवतात. पण काही काळजी बाळगली तर माठातील पाणी बाराही महिने थंड मिळू शकते.

> आठवडय़ातून ठरावीक दिवशी माठ आतून आणि बाहेरून स्वच्छ करून घ्यावे. कारण मातीच्या भांडय़ात आतमध्ये पाण्याच्या ओलाव्याने शेवाळे येऊ शकते. ते काढून टाकायचे.

> माठातील पाणी कायम थंड ठेवण्यासाठी ते ठेवण्याची जागा योग्य असली पाहिजे. जेथे दिवसभर सावली असते अशा ठिकाणी माठ ठेवावे… नाहीतर एखाद्या मोठय़ा वृक्षाखाली नीट झाकून ठेवले पाहिजे.

> माठात पिण्याचे पाणी ठेवण्याआधी माठाभोवती स्वच्छ टॉवेल किंवा स्वच्छ कपडा गुंडाळून ठेवा. हा कपडा भिजवून ठेवा. त्यानंतर माठात पाणी भरा. यामुळे माठातील पाणी जास्त काळ थंड राहाते.

> बाजारातून नव्याने माठ विकत घेताना ते पक्क्या मातीचे आहे का याची खात्री करून घ्या. ते कुठून तुटलेले किंवा भेग पडलेले नाही ना हेही पाहून घ्या.

> नवीन माठ घरी आणले की सर्वप्रथम ते साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. माठाच्या आत स्वच्छता करताना जरा सांभाळावे लागते.