घरातील झुरळे घालवायची… हे करून पहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

nघरात साफसफाई करूनही सतत झुरळे होत राहतात. घरात एकदा झुरळांचा शिरकाव झाला की मग ती अनेक प्रयत्न करूनही कमी होत नाहीत. झुरळे घरातून घालवण्यासाठी लसूण बारीक करून, त्यात व्हिनेगर घाला आणि हा स्प्रे बाटलीत भरून झुरळ असलेल्या ठिकाणी फवारा मारल्याने झुरळे कमी होतात.

nपाण्यात लाल तिखट मिसळून, ते एका स्प्रे बाटलीत भरा आणि घरात ज्या ठिकाणी जास्त झुरळे झाली आहेत, तिथे त्या फवारणी करा. झुरळांचा नायनाट करण्यासाठी हे तिखट पाणी तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. घरातील झुरळांना पळवून लावण्यासाठी कापूर बारीक करून, त्याची पावडर बनवा आणि ज्या ठिकाणी झुरळे फिरतात, त्या ठिकाणी ठेवा.