चष्म्याचा नंबर वाढत असेल तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1 चष्म्याचा नंबर सारखा वाढत असेल तर त्यासाठी काही सोपे उपाय करणे गरजेचे आहे. डोळ्यांचे व्यायाम करा. जवळ आणि दूर पाहणे चालू ठेवा, त्यामुळे दृष्टी सुधारते.

2 दोन्ही तळहात एकमेकांवर घासून ऊबदार करा, त्यानंतर बंद डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांना आराम मिळण्यास मदत होईल. डोळे अधूनमधून बंद करा.

3 पेन्सिल किंवा पेन हातात घेऊन जवळ किंवा दूर फोकस करा, यामुळे डोळ्याचे स्नायू बळकट होतील. सकाळी अनवाणी गवतावर चालल्याने डोळ्यांची नजर सुधारते.

4 पौष्टिक आहाराला प्राधान्य द्या. गाजर, आवळा, बदाम, पालक आणि पालेभाज्या खा. यामुळे डोळ्यांचे स्नायू बळकट होतात. हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

5 फोन, लॅपटॉप, टीव्ही, कॉम्प्युटर वापरताना दर 20 मिनिटांनी ब्रेक घ्या. 20 फूट दूर असलेल्या वस्तूंवर 20 सेकंद फोकस करा. डोळ्याला ताण येईल इतका फोन वापरणे
टाळावे.