घरातील पडदे स्वच्छ ठेवण्यासाठी… हे करून पहा

घर सुंदर दिसण्यासाठी पडदे स्वच्छ असणे तितकेच गरजेचे आहे. घरातील पडदे स्वच्छ नसतील, तर घर स्वच्छ दिसणार नाही. घरात आलेले लोक घराबाहेर पडल्यानंतर नाक मुरडतील. त्यामुळे घरातील पडदे स्वच्छ ठेवण्यासाठी काही गोष्टी नक्की करा. सर्वात आधी महिन्यातून दोनदा पडद्याला व्हॅक्युम करा. यामुळे पडद्यावरील धूळ निघून जाईल.

n महिन्यातून एकदा किंवा दोनदा पडद्याला खाली उतरवून बाहेर स्वच्छ हवेत लटकवा. पडद्याला व्यवस्थित धुवायला विसरू नका. पडद्याला थंड पाणी, डिटर्जेंट वापरून वॉशिंग मशीनमध्ये धुवा. वॉशिंग झाल्यानंतर हवेत सुकवा. हवेत सुकवल्यामुळे पडद्याच्या सुरकुत्या कमी होतील. तसेच पडद्यांचे आयुष्य वाढण्यास मदत होईल.