
1 अॅलर्जी, प्रदूषण, सतत मोबाईलचा वापर आणि संसर्गामुळे डोळ्यांची जळजळ होण्याची समस्या वाढते. त्यासाठी घरच्या घरी काळजी घेता येईल.
2 डोळ्यातील कचरा काढण्यासाठी कोमट किंवा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. डोळे बंद करून उबदार किंवा थंड कापडाचा शेक दिल्यास जळजळ कमी होते. भरपूर पाणी प्या, यामुळे डोळ्यांतील ओलावा टिकून राहतो.
3 मोबाईल किंवा संगणकावर काम करत असाल तर दर 20 मिनिटांनी ब्रेक घ्या. 20 फूट दूर पहा. बाहेर जाताना उन्हापासून संरक्षणासाठी चष्मा वापरा.


























































