
जर तुमच्या घरात दुर्गंधी येत असेल तर सर्वात आधी घराचे दरवाजे आणि खिडक्या उघडय़ा ठेवून हवा खेळती ठेवा. यामुळे घरातील ओलावा कमी होऊन दुर्गंधी कमी होईल. लिंबू, बेकिंग सोडा, कॉफी यांचा वापर करून तुम्ही दुर्गंधी कमी करू शकता. घर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा.
घरातील कचरा नियमितपणे डस्टबिनमधून काढा अन् डस्टबिन स्वच्छ ठेवा. ओल्या आणि सुक्या कचऱयासाठी वेगळय़ा डस्टबिनचा वापर करा. किचनमध्ये स्वयंपाक झाल्यानंतर लगेच भांडी स्वच्छ करा. बाथरूम आणि टॉयलेटमधून येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी नियमितपणे स्वच्छ करा. दिवसभरात घरात एकदा तरी एअर फ्रेशनर्सचा वापर करा.