टिप्स -पिवळीधमक हळद

टिप्स -पिवळीधमक हळद

  • पोटात जंत झाल्यास हळदीत थोडे मीठ घाला. एक ग्लास पाण्यासोबत रोज सकाळी हे प्या.
  • डोळ्यांची आग, लालसरपणा, सूज, डोळ्यांतून स्त्राव असल्यास हळदीच्या काढय़ाने डोळे धुवायचे.
  • मुका मार लागला असल्यास हळकुंड व आंबेहळद एकत्र उगाळून ते गरम करावे आणि त्यावर लावावे.
  • चेहऱ्यावर तारुण्यपीटिका, काळे डाग येत असल्यास हळकुंड व चंदन उगाळून त्याचा लेप चेहऱ्यावर लावावा.
  • आंघोळीपूर्वी हळद, मसुराचे पीठ व दुधाकरची साय एकत्र करून अंगाला लावा. घाम येणे कमी होईल.
  • चरबी वाढली असल्यास रोज रात्री झोपण्यापूर्की अर्धा चमचा हळदीचे चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्या.
  • जिभेला चव नसेल, तोंडाला दुर्गंधी येत असल्यास हळकुंडाच्या काढय़ाने चूळ भरावी. फायदा होतो.
  • कफ पडत असल्यास रात्री झोपण्यापूर्की हळकुंडाचा तुकडा भाजून तो चावून खावा. आराम मिळतो.
  • गरोदर महिलेने निरोगी गर्भासाठी तिच्या आहारात हळदीचा समावेश करावा. 
  • कानातून पाणी किंवा पू येत असल्यास हळदीसोबत वावडिंग व वेखंड यांची धुरी घेतल्यास उपयुक्त ठरेल.