
लोकसभेत बुधवारी काँग्रेसच्या काही महिला खासदार पंतप्रधानांच्या जागेजवळ जाऊन उभ्या होत्या. त्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज तहकूब केले. गुरुवारी लोकसभा अध्यक्षांनी पंतप्रधानांचे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाचे भाषण रद्द करण्यात आल्याचे सांगत काँग्रेसचे काही सदस्य पंतप्रधानांच्या आसनापर्यंत पोहचून काहीतरी अनपेक्षित कृत्य करू शकतात असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रीया देताना तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.
Delhi | Parliament Budget Session: TMC MP Mahua Moitra says,”…What is he (PM Modi) afraid of? Afraid of what, PM sahab?… He boasts of having a ‘56-inch chest.’ Four women went up to him. They had nothing in their hands except a flex banner, no weapons, nothing at all…He… pic.twitter.com/6GKeEgsU3F
— Press Trust of India (@PTI_News) February 5, 2026
” 56 इंचांची छाती असलेले पंतप्रधान साहेब नक्की कशाला घाबरलेयत? चार महिला पंतप्रधानांच्या आसनाजवळ गेल्या. त्यांच्या हातात फक्त बॅनर होते बाकी ना कुठे शस्त्र ना कशाने मारता येईल असे हत्यार होते. अजिबात काही नव्हतं तसं”, असे मोईत्रा यांनी सांगितले.
पुढे त्या म्हणाल्या, ”पंतप्रधानांनी भितीपोटी भाषण केलेले नाही. त्यांच्याजवळ बोलायला काही नव्हतेच. सांगायला काही नव्हते. आणि आज त्यांनी ओम बिर्लाजींना एक पट्टी पढवली असून ते पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे सभागृहात बोलत होते”.





























































