तृणमूलचे ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तृणमूल काँग्रेसचे संस्थापक सदस्य व माजी केंद्रिय मंत्री मुकुल रॉय (71) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर कोलकाता येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

मुकुल रॉय यांना पश्चिम बंगालच्या राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जायचे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांचे ते अतिशय विश्वासू सहकारी होते. तृणमूल काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाच्या सत्ता स्थापनेपर्यंत त्यांचे योगदान महत्त्वाचे होते. यूपीए सरकारच्या काळात ते रेल्वेमंत्री होते. त्यांनी वर्ष 2017 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता, मात्र ते 2021 मध्ये तृणमूलमध्ये परतले होते. मुकुल यांचे जाणे ही माझी वैयक्तिक हानी आहे. ते केवळ पक्षाचे नेते नव्हे तर आधारस्तंभ होते, अशा शब्दांमध्ये ममता बॅनर्जी यांनी रॉय यांच्या निधनावर संवेदना व्यक्त केल्या.