टोकियो ऑलिम्पिकसाठी 500 परिचारिका येणार धावून, आयोजन समितीकडून करण्यात आली मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात पुन्हा एकदा कोरोना वाढत चालला आहे. जपानमध्ये 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱया टोकियो ऑलिम्पिकचाही पाय खोलात गेला आहे. याच पार्श्वभूमीवर या प्रतिष्ठsच्या क्रीडा महोत्सवासाठी जगभरातून येणाऱया खेळाडूंच्या आरोग्याकडे लक्ष देताना टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजन समितीकडून जपानमधील नर्सिंग असोसिएशनकडे 500 नर्सेसची (परिचारिका) मागणी करण्यात आली आहे.

टोकियो ऑलिम्पिक आयोजन समितीचे प्रमुख तोशिरो मुता यावेळी म्हणाले की, 23 जुलै रोजी ऑलिम्पिकला सुरुवात होणार आहे. त्याआधी क्रीडाग्रामात नर्सेस असायला हव्यात, जेणेकरून खेळाडूंच्या आरोग्याकडे लक्ष देता येईल. यासाठी आमच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे.

दरम्यान, टोकियो व ओसाका येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. याच कारणामुळे काही देशांतील खेळाडूंनी जपानमधील पात्रता फेरीच्या स्पर्धांमधूनही माघार घेतली आहे.