‘टॉप100’शिक्षणसंस्थांनाच मिळणार विद्यापीठाचा दर्जा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

अनेक अधिमत विद्यापीठांनी (डीम्ड) आपल्याला विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी अर्ज केले आहेत. परंतु 20 वर्षे पूर्ण झालेल्या आणि राष्ट्रीय पातळीवर ‘टॉप100’मध्ये स्थान मिळवलेल्या शिक्षणसंस्थांनाच विद्यापीठाचा दर्जा दिला जाईल असे विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) स्पष्ट केले आहे.

यूजीसीने यासंदर्भात एक परिपत्रक काढले आहे. विद्यापीठाचा दर्जा मिळवण्यास इच्छुक संस्थांना नॅशनल बोर्ड ऑफ ऑक्रिडेशनचे प्रमाणपत्रही मिळवावे लागेल असे त्यात नमूद करण्यात आले आहे. विशिष्ट शैक्षणिक वर्गात देशामध्ये पहिल्या 50 संस्थांमध्ये त्यांना समाविष्ट व्हावे लागेल असेही त्यात म्हटले आहे.

इतरही काही निकष यूजीसीने लावले आहेत. त्यात संबंधित संस्थेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांची सरासरी 1ः20 असावी म्हणजेच दोन हजार विद्यार्थी असतील तर तिथे शंभरपेक्षा कमी शिक्षक असू नयेत, त्या संस्थेमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे पाच विभाग असावेत आणि तीन वर्षांचा एक संशोधन अभ्यासक्रम असावा हे निकषही पूर्ण करावे लागणार आहेत. हे निकष पाळले जात आहेत की नाहीत याचा आढावा यूजीसीकडून दरवर्षी घेतला जाणार आहे.