अनेक मार्गांनी आपण पर्यारवणाचं संवर्धन करत आहोत – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pench

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आनॅलाइन उपस्थितीत आज वन्यजीव सप्ताह सोहळ्याच्या उद्घाटनास पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या दोन वर्षात मुंबईसारख्या शहरात 808 एकर जंगल घोषित करणे, 15 पैकी 10 कन्झर्व्हेशन रिझर्व्ह्स एका निर्णयात जाहीर करणे, 9800 हेक्टर मॅनग्रोव्हज परिसर वाढवण्यासोबतच लवकरच बीकेसी आणि धारावीतील मॅनग्रोव्हज नोटिफाय केले जातील. अशा अनेक मार्गांनी आपण पर्यारवणाचं संवर्धन करत आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या लोगोचे अनावरणही करण्यात आले. तसेच जंगलं वाचवण्यात फॉरेस्ट गार्ड्सची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्यासाठीही आम्ही अनेक सुविधा उपलब्ध करून देत आहोत, असंही त्यांनी सांगितले.

मला अभिमान आहे की फक्त दोन वर्षात शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेणारे आणि शाश्वत विकासाला प्राधान्य देणारे कदाचित आपण एकमेव राज्य आहोत, असंही ते म्हणाले.