
सामना प्रतिनिधी । कर्जत
शेकडो वर्षांपूर्वींचे झाड गुरूवारी दुपारच्या सुमारास नेरळ-माथेरान घाट रस्त्यावरच कोसळले. दुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. परंतु दोन तास वाहतूक ठप्प होती. त्यामुळे माथेरान घाट रस्त्यावर वाहनांच्या रागांच रांगा लागल्या होत्या. दरम्यान रस्त्यावर प्रवाशांची आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. वन विभागाच्या सहाकार्याने दोन तासानंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली.
आठवडाभर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पावसाने सुरूवात केली आहे. दोन दिवस सतत पावसाने सुरूवात केल्याने अनेक ठिकाणी जमीन भुसभुशीत होवून झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच गुरूवारी दुपारच्या सुमारात नेरळ-माथेरान घाट रस्त्यात शेकडो वर्षांपूवींचे आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळले होते. भले मोठे झाड असल्याने सुमारे दोन तास वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे माथेरान घाटात वाहनांच्या रागांच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला.
या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आल्यानंतर वन विभागाने अधिकाऱ्यांनी जेसीबी आणून जेसीबी ज्या सहाय्याने हे झाड बाजूला केले आणि रस्ता मोकळा करून दिला. त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. झाड कोसळल्याने अनेक प्रवासी, प्रर्यटक, आणि स्थानिकांचा खोळंबा झाला असून अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

























































