महिन्याभरात 96 हजारांचा दंड वसूल; मालवण वाहतूक पोलिसांनी कामगिरी

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मालवण वाहतूक पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात केलेल्या कारवाईत 96 हजार 100 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तब्बल 438 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात मालवण शहरात वाहतूक नियमाचे उल्लंघन प्रकरणी वाहतूक पोलिसांनी 438 वाहन चालकांवर कारवाई केली. त्यात धोकादायक पद्धतीने गाडी चालवणे, परवाना नसणे, परवाना असून सोबत न ठेवणे, एकदिशा मार्गाचे उल्लंघन, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, पोलिसांनी थांबवण्याची सूचना करूनही न थांबणे, रस्त्यात गाडी उभी करून जाणे यासह अन्य नियमाचे उल्लंघन प्रकरणी तब्बल 96 हजार दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या