ज्या देशाला मी माझ्या धर्मासकट मान्य नाही, तो देश मला मान्य नाही! पाहा आनंदी गोपाळचा ट्रेलर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारित आनंदी गोपाळ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सन 1886मध्ये जेव्हा स्त्रियांना शिक्षण निषिद्ध मानलं गेलं होतं, तेव्हा आनंदीबाई पती गोपाळराव यांच्या साहाय्याने सगळ्या समाजाचा रोष पत्करून परदेशी गेल्या आणि डॉक्टरची पदवी मिळवून आल्या. हिंदुस्थानाच्या इतिहासात मानाचं पान ठरलेल्या या जोडप्याची कथा या चित्रपटात उलगडण्यात आली आहे.

आनंदीबाई आणि गोपाळराव यांचा 132 वर्षांपूर्वीचा समाजाविरुद्धचा संघर्ष नेमका कसा असेल, याचं पुरेपूर दर्शन हा ट्रेलर घडवतो. गोपाळराव यांचं तऱ्हेवाईक वागणं, जोडपं म्हणून असणारं सहजीवन आणि पतीसोबत पुरोगामी होताना स्त्री म्हणून होणारा आनंदीबाईंचा संघर्ष असे अनेक पैलू या ट्रेलरमधून दिसून येत आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद दिसणार आहेत. झी स्टुडिओज निर्मित आणि समीर विद्वांस दिग्दर्शित आनंदी गोपाळ हा चित्रपट 15 फेब्रुवारी 2019 रोजी प्रदर्शित होत आहे.

 पाहा आनंदी गोपाळचा ट्रेलर-