भुसावळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण; गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

भुसावळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने प्रशासनाकडून कर्मचारीकरिता प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणामध्ये 842 पैकी 801 कर्मचारी उपस्थित होते. तर 41 कर्मचारी गैरहजर होते. गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाकण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे .

प्रशिक्षण प्रथम प्रशिक्षण वर्ग सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत जिमखाना हॉल पी. ओ. नाहटा महाविद्यालय जामनेर रोड भुसावळ येथे पार पडला. तसेच ईव्ही मशिन हाताळणी प्रशिक्षण दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ताप्ति पब्लिक स्कूल भुसावळ येथे होते. द्वितीय सत्र दुपारी 12.30 ते 2 वाजेपर्यंत जिमखाना हॉल पी. ओ. नाहटा महाविद्यालय जामनेर रोड भुसावळ पार पडले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील, सहायक निकडणूक अधिकारी राजेंद्र फातले आणि नायब तहसीलदार संतोष विनंते उपस्थित होते.