ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्प टप्पा क्र. 3च्या पहिल्या सेगमेंटचे काम सुरू

443

मुंबईला नवी मुंबईशी जोडणार्‍या महत्त्वाकांक्षी मुंबई पारबंदर (ट्रान्सहार्बर) लिंकच्या टप्पा तीनच्या पहिल्या सेगमेंटचे काम सुरू करण्यात आले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त महानगर आयुक्त संजय खंदारे याच्या उपस्थितीत आज या कामाला सुरुवात झाली असून याप्रसंगी मुख्य अभियंता डॉ. डी. टी. थुबे यांच्यासह प्राधिकरणाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

मुंबईला नवी मुंबईशी जोडणार्‍या शिवडी ते न्हावाशेवा ट्रान्सहार्बर लिंकच्या टप्पा तीनच्या कामात 2.5 कि.मी. लांबीच्या पुलाचे व 1.5 कि.मी.लांबीच्या रस्त्याचे गावन गावपासून चिरले गावापर्यंत राष्ट्रीय महामार्ग एन. एच.4 बीपर्यंतचा समावेश होतो. 17,843 कोटी किमतीच्या या प्रकल्पाची तीन टप्प्यांत विभागणी करण्यात आली आहे.

ट्रान्सहार्बर लिंक

  • टप्पा 1 – शिवडीपासून 10.38 कि.मी. (10.38 कि.मी.)
  • टप्पा 2 – 10.38 कि.मी.ते 18.187 कि.मी. (7.807 कि.मी.)
  • टप्पा 3 – 18.187 कि.मी. ते चिरले (3.613 कि.मी.)
आपली प्रतिक्रिया द्या