
आजऑक्टोबरपासून ठाणे-वाशी- पनवेल ट्रान्सहार्बर मार्गावर एसी लोकलच्या 16 फेऱ्य़ा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. मध्य रेल्वेने कोरोनाच्या लाटेमुळे बंद केलेल्या ट्रान्सहार्बर मार्गावरील एसी लोकलच्या फेऱ्य़ा पुन्हा पूर्ववत केल्या आहेत. आज 7 ऑक्टोबरपासून ठाणे-वाशी- पनवेल ट्रान्सहार्बर मार्गावर एसी लोकलच्या 16 फेऱ्य़ा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
ट्रान्सहार्बर मार्गावर सोमवार ते शुक्रवार या 16 एसी फेऱ्य़ा चालविण्यात येतील, तसेच शनिवारी या फेऱ्य़ा नॉन एसी असतील आणि रविवारीही एसी लोकल चालविण्यात येणार नाही. केवळ रविवारी ठाणे ते नेरूळ आणि नेरूळ ते ठाणे अशी नॉन एसी फेरी रविवारच्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. या नव्या 16 एसी फेऱ्य़ांमुळे ट्रान्सहार्बर मार्गावरील एकूण लोकल फेऱ्य़ांची संख्या 246 वरून 262 इतकी होणार आहे. आणि मध्य रेल्वेच्या सध्याच्या एकूण फेऱ्य़ांची संख्या आता 1686 वरून 1702 इतकी होणार आहे. कोरानापूर्व काळात मध्य रेल्वेवर दररोज एकूण 1774 फेऱ्य़ा चालविण्यात येत होत्या. 7 ऑक्टोबरपासून 1702 फेऱ्य़ा धावणार असल्याने मध्य रेल्वे आपल्या 95.94 टक्के फेऱ्य़ा पूर्ववत करणार आहे.
साडेअकरा लाखांची कमाई
मध्य रेल्वेवरच्या मुख्य मार्गावर एसी लोकलच्या 10 फेऱ्य़ा सुरू असून सप्टेंबर महिन्यात एसी लोकलची कार्ड तिकीट आणि सिझन तिकिटांच्या विक्रीतून 23 हजार 362 प्रवाशांद्वारे एकूण 8 लाख 90 हजार 499 रुपयांची कमाई झाली आहे. तर 1 ते 5 ऑक्टोबर या पाच दिवसांत 7 हजार 227 प्रवाशांद्वारे 2 लाख 64 हजार 307 रुपयांची कमाई झाली आहे. अशी एकूण एसी लोकलमुळे मध्य रेल्वेला 11 लाख 54 हजार रुपयांची झाली आहे.



























































