
मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक मंगळवारी सकाळच्या वेळात विस्कळीत झाली आहे. नेरुळ ते ठाणे रेल्वे स्थानकांदरम्यान काही तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने या मार्गावरील उपनगरीय गाड्यांचे वेळापत्र पुरते कोलमडले आहे.
नेरुळ ते ठाणे दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाल्यानंतर दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आहे. लवकरच इथली वाहतूक सुरळीत करण्याचे रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. दरम्यान, ट्रान्स हार्बरमार्गावरील प्रवाशांचे मात्र हाल सुरू आहेत.


























































