प्रेमात धोका मिळाल्यावर तरुण तरुणी वाटेल त्या थराला जातात. प्रेमात आंधळा झालेल्या व्यक्तीच्या डोळ्यात बदल्याची भावना असेत. त्यामुळे चुकीच्या मार्गांचा अवलंब केला जातो. अशा अनेक घटना जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या आहेत. जपानमध्ये अशीच एक घटना घडली असून प्रेमात धोका मिळाल्यामुळे एका ट्रान्सजेंडर महिलेने 73 तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांना करोडोंचा चुना लावला आहे.
साउथ चाइना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, एका 49 वर्षीय ट्रान्सजेंडर महिलेला जपानमधील एका व्यक्तीने प्रेमात धोका दिला होता. त्यामुळे तिच्या मनात जपानी पुरुषांबद्दल सुडाची भावना निर्माण झाली. त्यानंतर तिने एक एक करत तब्बल 73 जपानी पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ती एवढ्यावरच थांबली नाही तर तिने त्यांना 7 करोड 38 लाख रुपयांना गुंडाळले आहे. सदर घटना उघडकीस येताच महिलेला अटक करण्यात आले आहे. “कॉलेजमध्ये असताना मला प्रेमात धोका मिळाला होता. त्यानंतर मागील 13 वर्षांपासून मी जपानी पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवत असल्याचे, महिलेने पोलिसांसमोर कबुल केले आहे.