मेटाकडून या युवकाला मिळालीय 845 कोटींची सॅलरी, वाचा

सध्याच्या घडीला सोशल मीडियावर 845 कोटींचा पगार हा चांगलाच चर्चेत आहे. हा पगार घेणारा युवक दुसरा तिसरा कुणी नसून, त्रापित बंसल आहे. आपल्या प्रत्येकाचं चांगल्या पगाराची नोकरी हे स्वप्न असतं. परंतु अनेकदा हे स्वप्न फार सहजगत्या मात्र साध्य होत नाही. उत्तरप्रदेशच्या त्रापित बंसलला मात्र चांगलीच बक्कळ पगाराची नोकरी मिळाली आहे.

एकप्रकारे त्रापितसाठी ही लाॅटरी लागलेली आहे. उत्तर प्रदेशच्या त्रापित बंसलची चर्चा सध्या खूप घडत आहे. सोशल मीडियावर सध्या त्रापितला सर्च करुन त्याच्या पगाराविषयी अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. Meta कडून त्रापितला ‘सुपर इंटेलिजेंस टीम’साठी कोट्यवधींच्या पगाराची नोकरी मिळालेली आहे. यातील गमतीची बाब म्हणजे, त्रापितला देण्यात येणारा आकड्यामध्ये किती शून्य आहेत हेच मोजताना गोंधळ उडेल. मेटाकडून त्रापितला दणदणीत दिलेले हे पॅकेज ऐकून अनेकांची बोलती बंद झाली आहे.

त्रापित बंसल हा मुळचा उत्तर प्रदेशचा आहे. त्याने त्याचे सुरुवातीचे शिक्षण हे उत्तर प्रदेशमधूनच पूर्ण केलं. त्यानंतर त्याने पुढील शिक्षणासाठी आयआयटी कानपूर गाठलं. कानपूर येथून ‘मॅथमॅटीक्स अँड स्टॅटिस्टीक्स’ विषयात त्याने त्याचे बीएससीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्याने पुढे अमेरिकेमध्ये शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.

मेटामध्ये काम करण्याआधी त्याने OpenAI, Facebook, Google, Microsoft आणि IISc Bangalore याठिकाणी त्याने इंटर्नशिपदेखील केली होती. तसेच 2012 मध्ये त्यानं आयरिश अमेरिकी कंपनीमध्ये अॅनालिस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली. याव्यतिरिक्त त्याने भारतीय विज्ञान संस्थेमध्ये तो रिसर्च असिस्टंट म्हणूनही काम त्याने केले होते. त्यानंतर तो 2022 मध्ये तो OpenAI साठी सुद्धा काम करु लागला. सध्याच्या घडीला तो Meta च्या सुपर इंटेलिजेंस टीममध्ये महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे.