
बनावट विमान तिकीट काढून मुंबई-दिल्ली असा प्रवास करणाऱयाला सहार पोलिसांनी अटक केली. मोहम्मद राशिद असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
तक्रारदार हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ)मध्ये उपनिरीक्षक म्हणून काम करतात. सोमवारी ते डय़ुटीवर आले. गेट नंबर सात येथे ते कर्तव्यास होते.तक्रारदार याने मोहम्मदला चौकशीसाठी थांबवले. त्याच्याकडे तिकिटाची मागणी केली. ते तिकीट बनावट असल्याचे उघड झाले. मोहम्मदला ताब्यात घेऊन सहार पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी मोहम्मदला अटक केली. त्याला ते बनावट तिकीट कोणी दिले याचा तपास सुरु आहे.



























































