ट्रेंड -सुंदरी सुंदरी

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर नेहमीच काही ना काही ट्रेंडमध्ये येते. आता सध्या इन्स्टाग्रामवर ‘सुंदरी सुंदरी’ या गाण्याने अनेकांना भुरळ पाडली आहे. या गाण्यावर रील करण्यासाठी अनेक जण उत्सुक असल्याचे दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शेकडो तरुणींना ‘सुंदरी सुंदरी’ गाण्याने वेड लावले आहे. मराठी गाण्यावर अनेक जण सुंदर डान्स करताना दिसत आहेत. डान्स स्टेप आणि हावभाव पाहून अनेक जण या रीलला लाईक करत आहेत. एकापेक्षा एक भारी कमेंट करत आहेत. तर काही जण या रीलला शेअर्स पण करत आहेत. ‘सुंदरी सुंदरी’ रीलला लाखो ह्युज मिळवण्यासाठी आणि हजारो लाइक्स मिळवण्यासाठी अनेक तरुणी या गाण्यावर रील करताना दिसत आहेत.