ट्रेंड – शेतीसाठी भन्नाट जुगाड

जुगाडाच्या बाबतीत हिंदुस्थानी लोकांचा हात कुणी धरू शकत नाही असले एकेक भन्नाट जुगाड पाहायला मिळतात! यामध्ये शेतकरीही कशातच मागे नाहीत. अशाच एका शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड व्हायरल होत आहे. या शेतकऱ्याने रानडुक्करांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी एक ढासू जुगाड शोधलाय. व्हिडीओमध्ये असे  दिसतेय की, पीक काढल्यानंतर आलेले धान्य शेतात सुकवण्यासाठी, पाखडण्यासाठी शेतकऱ्याने पसरवून ठेवले आहे. या वेळी कोणते प्राणी, पक्षी यामध्ये येऊ नये यासाठी या शेतकऱ्याने चक्क एक स्पीकर शेतात लावलाय. या स्पीकरमधून माणसांचे वेगवेगळे आवाज येत आहेत. म्हणजे जेव्हा कुणी नसेल तेव्हाही जनावरांना असे वाटेल की, त्या ठिकाणी कुणीतरी आहे. स्पीकरमधील आवाज ऐकून डुक्कर किंवा अन्य पक्षी, प्राणी शेतात येणार नाहीत. तसेच शेतकऱ्याला पिकाच्या रक्षणासाठी रात्रंदिवस शेतात राहावे लागणार नाही.