ट्रेंड – कर्मचाऱ्याच्या खात्यात आला 300 महिन्यांचा पगार

चिलीमधील एका कर्मचाऱ्याच्या खात्यात चक्क 300 महिन्यांचा पगार जमा झाला. हा कर्मचारी चिलीमधील डॅन कॉन्सोर्सियो इंडस्ट्रियल इस्टेट येथे सहाय्यक पदावर काम करत होता. त्याला साधारण दरमहा 386 पाउंड इतके वेतन मिळत होते. त्याच्या मालकाने चुकून त्याच्या खात्यात 1 लाख 27 हजार पौंड ट्रान्सफर केले. सुरुवातीला कर्मचाऱ्याने हे पैसे परत करणार असल्याचे मान्य केले. मात्र नंतर तीन दिवसांनी त्याने राजीनामा दिला. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले. तब्बल तीन वर्ष हा वाद सुरू होता. या काळात कर्मचाऱ्यावर चोरीचा आरोप करण्यात आला. सँटियागो येथील न्यायालयाने नुकताच या प्रकरणी निकाल दिला असून ही घटना चोरीची नसून अनधिकृत वसुलीची आहे, असे सांगितले. ही घटना सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय.