माँ साहेबांनी शिवसैनिकांत उर्जा निर्माण करण्याचे काम केले : चंद्रकांत खैरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तमाम शिवसैनिकांना चैतन्य, उर्जा, देण्याचे कार्य माँ साहेब मिनाताई ठाकरे यांनी केल्याची भावना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली. शिवसेना संभाजीनगर शाखेच्या वतीने गुलमंडी येथे भावभक्ती गीतांनी माँ साहेबांना आदरांजली वाहण्यात आली. या वेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी माँसाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

माँसाहेब यांनी माता-भगिनींना हळदी-कुंकु, सक्रांत, भाऊबीज, रक्षाबंधन सणाच्या माध्यमातून नेहमी एकत्र येण्याचे सांगत असत. मातोश्री येथे गेलेल्या प्रत्येक महिलेची सन्मानाने ओटी भरुन हळदी कुंकू लावत असल्याची आठवण शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी यावेळी सांगितले. बये दार उघड या घोषणेच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रातील तमाम माता भगीनींना शिवसेनेच्यावतीने साद घातली. माँसाहेब मिनाताई ठाकरे यांच्यासह तुळजाभवानी मातेच्या दर्शनाने महिला आघाडीची सुरुवात केल्याची आठवण जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सांगितली.आलाप ग्रुप प्रस्तुत अभिजीत शिंदे व सरला शिंदे यांनी माँसाहेबांना भक्तीगीतांनी आदरांजली अर्पण केली. हंबरुनी वासराला चाटते जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय अशा गीतांनी परिसर भावनीक झाला होता.

यावेळी सहसंपर्कप्रमख सुहास दाशरथे, महानगरप्रमुख प्रदिप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगांवकर, वैजयंती खैरे, सहसंपर्कसंघटक सुनिता आउलवार, जिल्हासंघटक सुनिता देव, युवासेना जिल्हायुवाधिकारी ऋषिकेश खैरे, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदूळवाडीकर, राजेंद्र राठोड, गणेश चोपडे, माजी जिल्हाप्रमुख राधाकृष्ण गायकवाड, विधानसभा संघटक राजु वैद्य, गोपाळ कुलकर्णी, सभागृह नेता विकास जैन, गटनेते मकरंद कुलकर्णी, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, नगरसेवक सचिन खैरे, उपशहरप्रमुख विजय सुर्यवंशी, विधानसभासंघटक मिरा देशपांडे, उपशहरसंघटक भागुबाई सिरसाठ आदींसह शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी व पदाधिकारी उपस्थित होते.