मायकल जॅक्सनला मूनवॉकमधून आदरांजली; टायगर श्रॉफने शेअर केला खास व्हिडियो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता टायगर श्रॉफ जबरदस्त ऍक्शन सीन आणि डान्ससाठी ओळखला जातो. पॉप सिंगिंगचा बादशहा मायकल जॅक्शनचा तो खूप मोठा चाहता आहे. मायकलला तो आपला गुरू मानतो. म्हणूनच आज मायकलच्या स्मृतिदिनी टायगरने त्याला अनोखी आदरांजली वाहिली आहे. टायगरने मायकल जॅक्सन शैलीतील स्कतःचा ‘लॉकिंग पॉकिंग’ डान्सचा व्हिडियो शेअर केला आहे. व्हिडियोच्या माध्यमातून त्याने गुरूचे स्मरण केले आहे.

टायगरने इन्स्टाग्राम अकाऊंटकर व्हिडियो शेअर केला आहे. त्यात टायगर मायकलच्या ‘द के यू मेक मी फील’ गाण्यावर थिरकताना दिसतोय. टायगरने अगदी हुबेहूब मायकलसारखा डान्स केला आहे. आतापर्यंत व्हिडियोला 20 लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाल्या आहेत. मायकेलच्या मूनकॉक डान्सचे चाहते असलेल्यांना हा व्हिडियो म्हणजे एक पर्वणी आहे.