
तरला दलाल या हिंदुस्थानातील सर्वात लोकप्रिय मास्टर शेफ. त्यांचे स्वयंपाकावर आधारित लिखाणही प्रचंड लोकप्रिय होते. त्यांनी 17 हजार हिंदुस्थानी पदार्थांना जगात ओळख मिळवून दिली. गृहिणी, स्वयंपाक शिकणाऱया, स्वयंपाकाची आवड जोपासणाऱया अनेकांसाठी त्या प्रेरणास्थान होत्या. तरला दलाल या लोकप्रिय मास्टर शेफ होत्या. त्यांच्या या क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. ‘रसोई की रानी’ हा किताब मिरवणाऱया तरला दलाल यांच्या जीवनावर आधारित ‘तरला’ ही वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. अभिनेत्री हुमा कुरेशीने तरला यांची भूमिका साकारली आहे. या वेब सीरिजच्या निमित्ताने सध्या तरला दलाल यांच्या नावाची चर्चा होत आहे.
आपली स्वयंपाकाची आवड जोपासत तिला व्यावसायिक रूप देणाऱया तरला दलाल यांनी अनेक मास्टर शेफ घडवले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. विकी रत्नानी, रणवीर ब्रार, विकास खन्ना, राखी वासवानी, उमा रघुरामन, मेघना कामदार, उर्मिला जमनादास आशेर अशा अनेक प्रसिद्ध शेफ्सच्या त्या प्रेरणास्थान होत्या. इन्स्टाग्रामद्वारे व्हिडीओ शेअर करीत या शेफ्सनी तरला दलाल यांना अनोखी श्रद्धांजली वाहत प्रेक्षकांना ‘झी 5’ ओटीटीवरील ‘तरला’ ही वेब सीरिज पाहण्याचे आवाहन केले.
























































