
राज्य सरकारने आज पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून पुण्यातील दहावी आणि बारावी बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्रिगुण कुलकर्णी यापूर्वी पुण्यातील यशदाचे उपमहासंचालक म्हणून कार्यरत होते.
अन्य बदल्यांमध्ये हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांची संभाजी नगर येथे मृदा व जलसंधारण आयुक्त म्हणून बदली झाली आहे. पुण्यातील महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंजिरी मानोलकर यांची पुण्यातील आदिवास संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मृदा आणि जलसंधारण आयुक्त प्रकाश खपले यांची मुंबईत महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे. तर राहुल रंजन महिवाल यांची महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


























































