
राज्यसभेतील 12 खासदारांच्या निलंबनावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल सुरू ठेवला असतानाच मंगळवारी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सभागृहात निवडणूक कायदा सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना ओब्रायन यांनी राज्यसभेची नियमावली (रुलबुक) फेकली. त्यामुळे त्यांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज पूर्ण होईपर्यंत निलंबित केले आहे.
…म्हणून जया बच्चन भाजपवर भडकल्या!
तुमचे वाईट दिवस लवकरच येतील, असा भाजपला शाप देणाऱया समाजवादी पक्षाच्या खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी मंगळवारी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले. मी खरंच संतप्त झाली आहे म्हणूनच असे बोलले. 12 खासदारांच्या निलंबनावरून संतप्त आहे. सरकारचे वाईट दिवस लवकरच येतील, असे सांगतानाच जया बच्चन यांनी ‘हा न्याय नाही. या सरकारकडून न्यायाची अपेक्षा बाळगण्यात काहीच अर्थ नाही’, असा टोलाही मोदी सरकारला लगावला.

























































