2026 च्या निवडणूकीनंतरचे धक्के दिल्लीच्या जमिनदारांना पण जाणवतील, तृणमूल काँग्रेसचे जोरदार प्रत्युत्तर

पश्चिम बंगालमध्ये शुक्रवारी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के बसले. कोलकातासह अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा संदर्भ देत भाजप व तृणमूल काँग्रेसने एकमेकांना डिवचले आहे.

भाजपने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना टॅग करत एक ट्विट केले आहे. ”ममता बॅनर्जींना हे धक्के SIR च्या भितीमुळे जाणवले का? असा सवाल भाजपने ट्विटरवरून केला. त्याला प्रत्युत्तर देताना तृणमूल काँग्रेसने देखील भाजपला जोरदार टोले हाणले.

”हे धक्के 2026 ला होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत होणाऱ्या दारूण पराभवाचा विचार करून बंगाल भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्याचे हे धक्के आहेत. आणि काळजी करू नका. हे दिल्लीतील जमिनदारांपर्यंत देखील हे धक्के पोहचतील”, असे जोरदार प्रत्युत्तर तृणमूल काँग्रेसने भाजपला दिले.