त्रिशतकवीर बॉब कूपर यांचे निधन

आपल्या चार वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत एका त्रिशतकासह चार शतके झळकावणारे महान ऑस्ट्रेलियन फलंदाज बॉब कूपर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. वयाच्या 25 व्या वर्षी मेलबर्न कसोटीत इंग्लंडविरुद्ध खेळताना कूपर यांनी 12 तासांच्या प्रदीर्घ खेळीत 589 चेंडूंत 20 चौकार मारत 307 धावांची खेळी साकारली होती. ही कसोटी त्यांच्या त्रिशतकासाठी सदैव लक्षात राहिली. हा कसोटी सामना अनिर्णितावस्थेत संपला होता. त्यांनी आपल्या 27 कसोटींच्या कारकीर्दीत 2061 धावा केल्या. तसेच पश्चिम ऑस्ट्रेलियासाठी प्रथम श्रेणी सामने खेळताना 147 सामन्यांत त्यांनी 10,595 धावा केल्या आहेत. ते काही काळ आयसीसीचे सामनाधिकारीसुद्धा होते.