
दुर्वास पाटील याने केलेल्या तिहेरी हत्याकांडचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर यांच्याकडे सपुर्द करण्यात आला आहे.हत्याकांडातील चार आरोपीना ८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दुर्वास पाटील याने त्याची प्रेयसी भक्ती मयेकर हिचा खून केल्यानंतर पोलीस तपासात दुर्वासचे कारनामे उघडकीस आले.दुर्वासने त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने तीन खून केल्याचे उघडकीस आले.या तिहेरी हत्याकांडात पोलिसांनी चार आरोपीना अटक केले आहे.त्यांना ८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.दरम्यान भक्ती मयेकर हिचा मोबाईल सायली बार मध्ये सापडल्याने आता तपासाला वेगळी दिशा मिळणार आहे.हा बार सील करण्यात आला आहे.