Video ‘ट्रिपल सीट’चा भन्नाट टिझर प्रदर्शित

459

‘आयुष्यात दिलेली वेळ आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी काही लोक फार तत्पर असतात. त्यांच्या मते, आयुष्याचा प्रवास हा यातूनच पुढे जात असतो’. अशाच पृष्णा सुर्वेची हटके मनोरंजक कथा संकेत पावसे दिग्दर्शित ‘ट्रिपल सीट’ या आगामी मराठी चित्रपटात बघायला मिळणार असल्याचे या चित्रपटाच्या भन्नाट टिझरवरून लक्षात येते. यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरणाऱया ‘ट्रिपल सीट’चा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. टिझरमध्ये अभिनेता अंपुश चौधरी हा हात जोडत मी कृष्णा सुर्वे अशी स्वत:ची ओळख करून देत, आपण आयुष्याच्या प्रवासातील एक प्रवासी असून आपली स्टेअरिंग वरच्याच्या हातात असल्याचे सांगतो.  एका अंधाऱया खोलीत बसलेली एक तरुणी कृष्णाला कॉल करून मदत करण्याची विनंती करते. ही तरुणी नेमकी कोण आहे? आणि कृष्णा तिची मदत करणार का? याविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वे, पल्लवी पाटील यांच्यासह प्रवीण तरडे, राकेश बेदी यांच्या चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपट 24 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होईल.

आपली प्रतिक्रिया द्या