
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ५००% टॅरिफ लादण्याची धमकी दिल्यानंतर हिंदुस्थानी शेअर बाजारात दबाव दिसून आला. ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात मोी घसरण झाली आहे. आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे. सर्वाधिक 4 टक्क्यांची घसरण टीसीएसच्या शेअरमध्ये दिसून आली. रशियाकडून तेल खरेदीमुळे हिंदुस्थानवर 500 टक्के टॅरिफ लादण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानसारख्या देशांना रशियाकडून तेल किंवा युरेनियम खरेदी केल्यास ५००% पर्यंत शुल्क लादण्याची परवानगी देणाऱ्या विधेयकाला हिरवा कंदील दाखवला. गुंतवणूकदारांचा असा विश्वास आहे की ट्रम्प यांच्या कठोर भूमिकेचा प्रामुख्याने अमेरिकन बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या क्षेत्रांवर परिणाम होईल. रशियाकडून तेल खरेदीबाबत अमेरिकेच्या कठोर भूमिकेमुळे हिंदुस्थान-अमेरिका व्यापार संबंध ताणले जाऊ शकतात.
शेअर बाजारात गुरुवारी सकाळी व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही घसरले. सकाळी 12 वाजेपर्यंत सेन्सेक्स अंदाजे ४६०.३७ अंकांनी खाली आला होता, तर निफ्टीतही १७९.७५ अंकांची घसरण झाली होती. यावेळी, सेन्सेक्स ८४,५००.७७ वर व्यवहार करत होता. तर निफ्टी 50 ने २६,००० ची महत्त्वाची पातळी तोडून २५,९६१ वर पोहोचला होता. आयटी आणि ऑटो क्षेत्रातील काही प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एशियन पेंट्स, मारुती, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि अल्ट्राटेक सिमेंट सारख्या शेअर्सवर दबाव दिसून आला.



























































