
आजच्या काळात मोबाईल आणि कॉम्प्युटर स्क्रीन पाहण्यात आपला जास्त वेळ जातो. त्यामुळे डोळय़ांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. दर 20 मिनिटांनी मोबाईलच्या स्क्रीनवरून नजर वळवून 20 फूट अंतरावरील वस्तूकडे किमान 20 सेकंद तरी पहा. यामुळे डोळय़ांवरचा ताण कमी होतो.
मोबाईलची ब्राईटनेस लेव्हल खूप कमी किंवा खूप जास्त ठेवू नका. मोबाईल डोळय़ांच्या जास्त जवळ ठेवू नका. त्याचा जास्त वेळ वापर करणे टाळा. दररोज सात ते आठ तास व्यवस्थित झोप घ्यावी. डोळे कोरडे पडल्यास डोळय़ांवर थंड पाणी मारल्यास आराम मिळतो.