
तुळशीच्या रोपाला हिरवेगार ठेवण्यासाठी त्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तुळशीला दररोज किमान 4 ते 6 तास थेट सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा. नियमित पाणी देणे आवश्यक आहे, कुंडीत पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. तुळशीला रेफ्रिजरेटरजवळ किंवा जास्त थंड ठिकाणी ठेवणे टाळा.
माती ओली असावी, पण दलदलीची नसावी. कारण जास्त पाण्यामुळे मुळे सडतात आणि बुरशी येऊ शकते. तुळशीसाठी सुपीक आणि पाण्याचा निचरा होणारी माती वापरा. गरज वाटल्यास मातीत शेणखत मिसळू शकता. जेव्हा रोपाच्या फांद्या 4 ते 6 इंच उंच वाढतात, तेव्हा वरच्या बाजूच्या फांद्या चिमटा काढून तोडा.