
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
व्हॉट्सअॅपवरून पैशांची देवाणघेवाण करणे सोपे आणि सुरक्षित असल्याची खात्री युजर्सना हळहळू पटत आहे. आतापर्यंत हिंदुस्थानातील १० लाख युजर्सवर व्हॉट्सअॅप पेमेंटची चाचणी झाल्याची माहिती नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) दिली आहे. व्हॉट्सअॅप पेमेंट सर्व्हिसची चाचणी गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या सर्व्हिसमुळे पेटीएमप्रमाणे व्हॉट्सअॅपवरून आर्थिक व्यवहार करता येतील. ही सर्व्हिस कधी सुरू होणार, हे अद्याप फेसबुकने जाहीर केले नाही. ज्या १० लाख युजर्सवर व्हॉट्सअॅप पेमेंट सुविधेची चाचणी होत आहे, त्यांच्याकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.


























































