तुकाराम मुंढे दिव्यांग कल्याण विभागात

राज्य सरकारने आज पाच सनदी अधिकाऱयांच्या बदल्या केल्या आहेत. तुकाराम मुंढे यांची बदली दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे. अत्यंत कडक शिस्तीचे म्हणून ओळखल्या जाणाऱया तुकाराम मुंढे यांची सनदी सेवेतील गेल्या वीस वर्षांतील ही 23वी बदली असल्याचे सांगण्यात येते. नितीन पाटील यांची नियुक्ती मुंबईत विशेष आयुक्त, राज्य कर या पदावर झाली आहे. तर अभय महाजन यांची नेमणूक महाराष्ट्र राज्य कापूस महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक या पदावर झाली आहे. ओमकार पवार यांची बदली नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली आहे तर आशा अफजल खान पठाण यांची बदली वनामती, नागपूरचे महासंचालक पदी करण्यात आली आहे.