तुर्कीकडून सीरियावर ‘एअर स्ट्राईक’, अमेरिका, हिंदुस्थानने केला हल्ल्याचा तीव्र विरोध

सीमेवरील आपले सैन्य मागे हटविण्याची घोषणा अमेरिकेने केल्यानंतर तुर्कीने आपल्या शेजारील राष्ट्र सीरियावर ‘एअर स्ट्राईक’ सुरू केले आहेत. क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, तुर्कीने हल्ले करू नयेत, संयम ठेवावा असा इशारा अमेरिकेने दिला आहे. हिंदुस्थाननेही या हल्ल्यास विरोध केला आहे. एअर स्ट्राईक म्हणजे सीरियातील ‘इसिस’ आणि कुर्द बंडखोरांविरुद्ध कारवाई आहे असा दावा तुर्कीने केला आहे.

काय आहे प्रकरण?
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरिया-तुर्की सीमेवरील तैनात असलेले अमेरिकेचे सैन्य मागे हटविण्याची घोषणा केली होती. तुर्कीने स्वतःच्या समस्येवर उपाय शोधावा असे ट्रम्प यांनी म्हटले होते. अमेरिकन सैन्य मागे हटले तर आम्ही सीरियावर हवाई हल्ले करू अशी घोषणा तुर्कीचे राष्ट्रपती रजब तैयब एर्दोआन यांनी दिली होती. त्यानुसार हल्ले सुरू केले आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या